मणिपूर मधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. आदिवासींच्या निदर्शनादरम्यान हिंसाचार झाला होता. यानंतर 8 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. हिंसाचारग्रस्त भागात कलम 144 लागू आहे. संपूर्ण राज्यात 5 दिवस इंटरनेट सेवा बंद आहे. (Manipur Violence Update) गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारामुळे राज्यात तणावाचे वातावरण आहे.
मणिपूरमध्ये सध्या अत्यंत धोकादायक अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी NIT अभ्यासक्रमासाठी मणिपूरमध्ये शिकायला जातात. या सगळ्यामुळे शिक्षणासाठी मणिपूरमध्ये गेलेले महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक तणावात आहेत. दरम्यान आता या विद्यार्थ्यांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी फोनवरुन संवाद साधला आहे.
ब्रेकिंग! शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार, 9 जणांचा जागीच मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, विद्यार्थ्यांना तुम्ही कोणतीही काळजी करु नका, असा सल्ला दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही मणिपूर सरकारशी देखील संपर्क केला आणि या विद्यार्थ्यांना तत्काळ, परिस्थिती पूर्वपदावर येईस्तोवर त्यांना सुरक्षित वातावरणात ठेवण्याची विनंती केली आहे.