Devendra Fadnavis । मुंबईचे हृदयसम्राट कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) आहेत. असं मोठं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केले आहे. बोरिवली येथील मागाठाणे येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी फडणवीस यांचे कौतुक करताना हे वक्तव्य केले आहे. सध्या आशिष शेलार यांच्या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. (Mumbai News )
Rohit Sharma । रोहित शर्माने मैदानामधेच आपल्या सहकाऱ्याला केली शिवीगाळ, पाहा video
राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला बोरिवली येथील मागाठाने या ठिकाणी राजमाता जिजाऊ चौकाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात भाषण करताना आशिष शेलार यांनी मुंबईच्या विकास कामावरून देवेंद्र फडणवीसनवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.
Accident News । मोठी बातमी! माजी मुख्यमंत्र्यांच्या कारचा भीषण अपघात
मुंबईतील अनेक विकासकामे देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. मुंबईच्या विकासाच्या इतिहासाची पार्श्वभूमी पाहिली तर खऱ्या अर्थाने मुंबई हृदयसम्राट कोणी असेल तर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. असं आशिष शेलार म्हणाले आहेत. सध्या त्यांच्या वक्तव्याच्या राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.