Devendra Fadnavis । पुण्यात रविवारी (19 मे) भरधाव वेगात असलेल्या पोर्श कारच्या धडकेत दोघांना आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असून त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. वृत्तानुसार, आरोपीच्या वकिलाने सांगितले की, त्याच्या जामिनावर पुनर्वसन आणि जागरुकतेच्या अटी आहेत. मंडळाने 17 वर्षीय मुलाला येरवड्यातील वाहतूक पोलिसांसोबत 15 दिवस काम करण्यास, मद्यपान सोडण्यासाठी वैद्यकीय उपचार घेण्यास आणि मानसिक समुपदेशन घेण्यास सांगितले आहे.
Kalyan Constituency । धक्कादायक! ‘वंचित’च्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्यांकडूनच तुफान मारहाण
आरोपी तरुणाला 12 तासांच्या आत जामीन मंजूर झाला आहे. कोर्टाने काही अटींसह त्याला जामीन दिला आहे. यामुळे अनेकांकडून मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता या प्रकरणी आता सरकारने दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी याबाबत कठोर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Loksabha Election । तरुणाने आठ वेळा केले मतदान, पोलिसांनी केली अटक; ‘या’ ठिकाणी होणार पुन्हा मतदान
या प्रकरणामधील आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास, त्यावेळचे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही पाहून लगेचच संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्या आहेत.