Devendra Fadnavis । राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा!

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis । राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गट शेतीसाठी लवकरच एक नवा धोरण लागू करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गट शेतीमुळे शेतकऱ्यांना शेतीला आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर, यांत्रिकी साधनांचा उपयोग, तसेच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर उपाय मिळू शकतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Crime News । भयानक! सावत्र आईसह तीन भावंडं आणि मित्राची निर्घृण हत्या! अखेर १७ वर्षांनी आरोपीला पोलिसांनी पकडले

मुख्यमंत्र्यांनी याबद्दल बोलताना सांगितलं की, राज्यातील 75 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत, ज्यांच्याकडे एक ते दोन हेक्टरपेक्षा कमी जमिन आहे. अशा शेतकऱ्यांसाठी गट शेती हा एक योग्य पर्याय ठरू शकतो. गट शेतीमध्ये शेतकरी एकत्र येऊन एकसंध शेती करतात, ज्यामुळे उत्पादन क्षमता वाढवता येते. तसेच यांत्रिकी साधनांचा सामायिक वापर करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं, आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर योजनांचा लाभ घेणे शक्य होईल.

Supriya Sule । जयकुमार गोरे प्रकरणावर सुप्रिया सुळेंचा घणाघात, सरकारवर गंभीर आरोप

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2024’ कार्यक्रमात शेतकऱ्यांना गट शेतीचे फायदे सांगितले. गट शेतीमुळे शेतकऱ्यांमध्ये समन्वय वाढेल, तंटे कमी होईल आणि त्यांना सरकारी योजनांचा अधिक लाभ मिळू शकतो. ड्रोन, ठिबक सिंचन, हार्वेस्टरसारखी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्यांची कामे अधिक सोपी होईल आणि उत्पादन क्षमता वाढेल.

Disha Salian Case । दिशा सालियानच्या वडिलांचा खळबळजनक खुलासा, राजकीय चर्चांना उधाण

मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबद्दलच्या धोरणावर अधिक काम चालू असल्याचे सांगितले आणि लवकरच हे धोरण अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात एक नवा बदल घडवून आणला जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Crime News l धक्कादायक! नाशिकमध्ये दुहेरी हत्याकांड, अजित पवार गटाचा नेता आणि त्याच्या भावाची हत्या

Spread the love