Devendra Fadnavis । एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला जालन्यात काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जालना दौऱ्यावर असताना बदनापूर या ठिकाणी मराठा आंदोलकांकडून त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा समाजाला अजूनही आरक्षण मिळालेले नाही. त्याचबरोबर मराठा आंदोलक सध्या आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतंय.
मराठा आंदोलकांकडून ठिकठिकाणी आंदोलन देखील केले जात आहेत. हे सर्व घडत असतानाच आज देवेंद्र फडणवीस यांनी बदनापूर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताला भेट दिली. त्यानंतर ते जालनाकडे निघाले मात्र यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आहेत. त्याचबरोबर ‘फडणवीस गो बॅक’च्या घोषणा देखील दिल्या आहेत.
Supriya Sule । सुप्रिया सुळेंनी घेतला अजितदादांचा धसका, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला मोठा निर्णय
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
फडणवीसांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर आली आहे. मात्र आरक्षणासाठी आता मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे.
Rakhi Sawant । अभिनेत्री राखी सावंतला पुन्हा लग्न करायचंय, लग्नाबाबत केले मोठे वक्तव्य!