Devendra Fadnavis । मुंबईतील दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. विशेष म्हणजे घोसाळकर यांना गोळ्या घालणारा आरोपी मॉरीस भाई यानेही स्वत:वर गोळी झाडली. त्याने स्वतःवर चार वेळा गोळी झाडली. त्याचाही मृत्यू झाला आहे. या घटनेवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Abhishek Ghosalkar | “…तर अभिषेक घोसाळकर यांचा जीव वाचला असता”
याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एका तरुण नेत्याच अशा पद्धतीने निधन व्हाव हे अतिशय गंभीर आहे. काही लोक या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतायेत. हे योग्य नाही” असं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर यावेळी त्यांनी विरोधकांवर देखील निशाणा साधला आहे. विरोधी पक्षांची सध्याची स्थिती अशी आहे की, एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी, ते राजीनामा मागतील. अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबाराची घटना गंभीर आहे. त्यासाठी त्यांनी राजीनामा मागितला, तर मला आश्चर्य वाटत नाहीय. अस फडणवीस म्हणाले आहेत.
Maharashtra Politics । निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराने मनसेला ठोकला रामराम
गोळी झाडणारा मॉरीस भाई कोण?
गँगस्टर मॉरिस हा बोरिवली पश्चिम येथील आयसी कॉलनीमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. तो समाजसेवक मॉरिस नरोना उर्फ मॉरिस भाई म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यावर बलात्कार, खंडणी व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एका महिलेची ८८ लाख रुपयांची फसवणूक आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याने या महिलेला धमकीही दिली होती. धमकीचा कथित व्हिडिओही व्हायरल झाला होता. एवढेच नाही तर न्यायालयात जाताना त्यानी पत्रकारांनाही धमकावले असल्याचे बोलले जात आहे. मॉरिस भाई यांनी प्रभाग क्रमांक एकमधून महापालिकेची निवडणूक लढवली होती.
Buldhana Bus Accident । एसटी-बस आणि ट्रकचा भीषण अपघात, एकजण जागीच ठार तर १५ प्रवासी गंभीर जखमी