Devendra Fadnavis । मुंबईच्या उल्हासनगर परिसरात मध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हिललाईन पुणे पोलीस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आता या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Mahesh Gaikwad News । महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत समोर आली मोठी अपडेट
महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर त्या ठिकाणच्या परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. गणपत गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर व घराबाहेर पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत.
दरम्यान, कल्याण पूर्वेत शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यात नेहमीच वाद होत होते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दोन्ही नेते पुन्हा आमने-सामने आले होते. त्यानंतर हे प्रकरण हिललाईन पोलीस ठाण्यापर्यंत गेले आणि यावेळी संतापलेल्या भाजप आमदाराने महेश गायकवाड यांच्यावर एकापाठोपाठ जवळपास पाच गोळ्या झाडल्या.
BJP Mla Firing । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शिंदे गटाच्या नेत्यावर भाजप आमदाराकडून गोळीबार
या गोळीबाराच्या हल्ल्यामध्ये महेश गायकवाड गंभीर जखमी झाले आहे तर त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांना देखील गोळी लागल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.