
Devendra Fadnavis । लाँड्रिंग प्रकरणात १८ महिने तुरुंगवास भोगलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) गटात प्रवेश केल्याचे वृत्त आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत घेणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.
विधानभवनात अनेक नेत्यांची भेट घेतली
गुरुवारी सकाळी नवाब मलिक विधानसभेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी नागपूरला पोहोचले आणि त्यांनी विधान भवन संकुलात अजित पवार यांच्या गटातील नेत्यांची भेट घेतली. या काळात ते अनेक आमदारांना भेटले आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसले. तब्बल दोन वर्षांनी ते सभागृहात आले आहेत. मात्र याला देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला आहे.
पाहा फडणवीसांनी नेमकं पत्रात काय म्हंटल आहे?
सत्ता येते आणि जाते.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2023
पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा… pic.twitter.com/WDzm3Pjo3f