Devendra Fadnavis । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या मुलाच्या ऑडी कार प्रकरणावर राजकीय वर्तुळात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. (Chandrasekhar Bawankule’s son’s Audi car case)
Ajit Pawar । “मला मुख्यमंत्रिपद द्या…” अजित पवारांनी अमित शाहांकडे केली मागणी
फडणवीस यांनी सांगितले की, “ऑडी प्रकरणाची एफआयआर दाखल करण्यात आली आहे आणि पोलिसांनी काही तथ्य समोर आणली आहेत. तथापि, ज्या पद्धतीने राजकारणात या प्रकरणाचा वापर केला जात आहे, ते चुकीचे आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना टार्गेट करणे हे पूर्णपणे अन्यायकारक आहे.”
Sharad Pawar | निवडणुकीआधी ‘तो’ पक्ष शरद पवारांपासून दुरावणार? राजकीय वर्तुळात खळबळ
देवेंद्र फडणवीस हे नागपूर दौऱ्यावर असताना विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी, बावनकुळे यांच्या मुलाच्या कार प्रकरणावर पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रकरणात फडणवीसांनी बावनकुळेंच्या बाजूने भूमिका घेतली आणि विरोधकांवर टीका केली. “पोलिसांनी या प्रकरणातील एफआयआर दाखल केलेली आहे. त्यामुळे चौकशी चालू आहे.” असे फडणवीस म्हणाले.
Reliance Jio च्या वर्धापनदिनानिमित्त धमाकेदार ऑफर; 700 रुपयांपर्यंतचा फायदा