Devendra Fadanvis। राज्याच्या राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस काल रात्री सव्वा दहाच्या दरम्यान दाखल झाले होते. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. या प्रकरणावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
“राज्याचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी बैठक घेतली तर त्यात काय नवल आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. दरम्यान या दोन तासांच्या बैठकीत मराठा आरक्षण (Maratha Reservation), ओबीसी आरक्षण (OBC Reservation) तसेच कांदा प्रश्नावर चर्चा झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. परंतु बैठकीचे खरे कारण अजूनही समोर आले नाही.
Rahul Gandhi । राहुल गांधींच्या पुन्हा अडचणी वाढणार? न्यायालयाकडून नोटीस जारी
इंडिया आघाडीकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंतीनिमित्ताने मार्चचं आयोजन करण्यात आलं आहे. या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर टीका केली. “इंडिया आघाडीच्या नेत्यांनी या मार्च निमित्ताने स्वतःची मनं साफ करून घ्यावीत”, अशी जहरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना केली आहे.
Hafiz Saeed Son । पाकिस्तानला मोठा धक्का! मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदच्या मुलाची हत्या?