Devendra Fadnavis । लातूर : पावसाने यावर्षी राज्याकडे पाठ फिरवली (Rain in Maharastra) आहे. जेमतेम पाण्यावर पिके कशी जगवायची? असा सवाल आता शेतकरीवर्गाला होत आहे. जर येत्या काळात पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. शिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला (Rain Update) आहे. अशातच महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. (Latest Marathi News)
Rule Changes in September । सर्वसामान्यांना बसणार आर्थिक फटका! आजपासून होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल
दरम्यान, मागील एक महिन्यापासून लातूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. पावसाअभावी पिकं जळून जाण्याच्या मार्गावर आली आहेत. काही शेतकरी विहिरीतील पाण्यावर पिके जगवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आले आहे. आता या प्रकरणाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. (Political News)
Havaman Andaj । दिलासादायक! विजांच्या कडकडाटासह पावसाचे होणार आगमन, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
“शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, नाहीतर घरी पाठवेन. पाऊस नसल्यामुळे पिके सुकून जात आहेत. शेतकऱ्यांनी जगावे कसे हा प्रश्न सतावत असतांना भविष्यातील उपाययोजना तर तुम्ही राबवा. परंतु कोणत्या अधिकाऱ्याने शेतकऱ्यांना अडचणीत आणले तर त्याला सस्पेंड करेन,” असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.