Baramati Loksabha । महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Election) पार पडणार आहेत. निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. पण यंदा संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष बारामती मतदारसंघाकडे लागले आहे. कारण या मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. अशातच आता वरिष्ठ नेत्यांकडून मतदारसंघातील नेत्यांना समज देण्यात आला आहे.. (Latest marathi news)
Congress । काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा
रविवारी रात्री उशिरापर्यंत बारामती लोकसभा मतदार संघातील वाद मिटवण्यासाठी सागर बंगल्यावर चर्चा सुरु होती. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हर्षवर्धन पाटलांना (Harshvardhan Patil) समज देण्यात आला आहे. “बारामतीतील महायुतीचा जो उमेदवार असेल त्यासाठी काम करा. महायुतीच्या उमेदवाराविरोधात कोणताही प्रचार करू नका. तसेच समर्थकांना सुद्धा तसा समज द्या”, अशा थेट सूचना देवेंद्र फडणविसांनी दिल्या आहेत.
देवेंद्र फडणविसांच्या या सूचनेनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकसभेसाठी महायुतीचे दोन उमेदवार इच्छुक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांना समज देऊनही त्यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे बारामती मतदारसंघात निवडणूक अटीतटीची होऊ शकते. बारामती मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि विजय शिवतारे यांच्यात लढत होणार आहे.
Sharad Pawar । शरद पवार यांना सर्वात मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने वेळेवर दिला धोका