मुंबई : भाजपच्या अनेक नेत्यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. त्यामुळे मागच्या काही दिवसापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडी सीमा समस्या, बेरोजगारी इत्यादी प्रश्नांवर शिंदे-फडणवीस सरकारला जाब विचारण्यासाठी उद्या १७ डिसेंबरला महामोर्चा काढणार आहे. या मोर्चाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी परवानगी देखील दिली आहे.
विक्रमी पीक काढल्यास शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये; जाणून घ्या, काय आहे प्रक्रिया?
“ मोर्चा शांतपणे व्हावा, त्याला परवानगी दिली आहे. लोकशाहीची पद्धत वापरून जर कोणाला विरोध करायचा असलेत तर ते विरोध करतील. आम्ही फक्त कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहीले पाहीजे याकडे लक्ष देऊ.” असं फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.
”सुषमा अंधारे माकडीण…”, शिंदे गटाच्या महिलेची बोचरी टीका
त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ठाकरेंच्या शिवसेनेतील काही नेते हे वारकरी संतांबद्दल बोलत आहेत. त्याचबरोबर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतही त्यांचे विधान आहे. यामुळे लोकांच्या मनात संताप आहे. आणि तो व्यक्त करावा लागेल”.
देशातील तरुण पिढी नशेखोर होण्याला केंद्र सरकार जबाबदार; नाना पटोले यांच्याकडून गौप्यस्फोट!