Devendra Fadnavis । मुंबई : मागच्या काही दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहिले होते. त्यानंतर आता या प्रकरणाचे विधानसभेत देखील पडसाद उमटले आहेत. त्यावरूनच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश आंबेडकर यांना क्लीन चिट दिली. फडणवीस म्हणाले औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहने गुन्हा नाही मात्र फडवणीसांचे हे उत्तर प्रकाश आंबेडकर यांना पटले नसून त्यांनी फडणीसांवर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस गोलमाल उत्तर देत असल्याची बोचरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. “काल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहने आणि पोस्ट ठेवणे यासंदर्भात मुद्दा उपस्थित करून चर्चा करण्यात आली. अबू आझमी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे उत्तर दिलं ते गोलमाल उत्तर आहे” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
Goat Disease । सावधान! शेळी आणि मेंढ्यांमध्ये झपाट्याने पसरतोय हा जीवघेणा आजार
त्याचबरोबर खऱ्या अर्थाने त्यांनी उत्तर दिले पाहिजे की देशात कुणाच्याही मजारीवर, कबरीवर जाण्यास बंदी आहे का? याचा खुलासा करावा. कुणाचं काय मत आहे हा वेगळा भाग आहे पण, कायद्याने बंदी असेल तर ते सांगावं. आणि कायद्याने बंदी नसेल तर त्याचाही त्यांनी खुलासा करावा. असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
Na Dho Mahanor । रानकवी ना.धों. महानोर कालवश! ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास