Devendra Fadnavis । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे भाजपमध्ये स्वागत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी चव्हाण उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान या पक्षप्रवेशावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षातील नेते भाजपच्या गळाला कसे लागतात? या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “विरोधी पक्षाने यायचं की नाही हे त्यांना विचारा. आम्ही कोणतंही टार्गेट घेऊन चालत नाही. ज्या नेत्यांच्या येण्यामुळे आपल्या पक्षाला बळ मिळेल आणि जे नेते आपल्यासोबत येऊ शकतात, त्यांच्याशी चर्चा होते. आणि जर त्या नेत्यांना देखील मुख्यप्रवाहात यावं असं वाटत असेल तर ते येतात. ”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
Ashok Chavan । ब्रेकिंग! अखेर अशोक चव्हाण यांनी केला भाजपमध्ये प्रवेश
त्याचबरोबर पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आजचा दिवस आनंदाचा आहे. राज्यातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले, अनेकवेळा मंत्री राहिलेले, दोनदा खासदारही राहिलेले ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अशोक चव्हाण यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्राथमिक सदस्यत्व दिले. मी त्यांचे मनापासून स्वागत करतो. त्यांच्यासारख्या नेत्याच्या आगमनाने महाराष्ट्रात भाजप आणि महायुती मजबूत झाली आहे”.