Devendra Fadnavis । मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांना किती पगार मिळणार? वाचा महत्वाची माहिती

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis । देवेंद्र फडणवीस हे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 132 जागांवर विजय मिळवला आणि महायुतीने 230 जागांवर आपली सत्ता मजबूत केली. फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपदात आगमन होत असताना, त्यांना मिळणारे पगार आणि सुविधा हे सुद्धा चर्चेचा विषय बनले आहेत.

Eknath Shinde । अखेर एकनाथ शिंदेंची नाराजी दूर? शिंदे अॅक्टिव्ह मोडवर

मुख्यमंत्र्यांच्या पगारात मोठा बदल 2016 मध्ये झाला होता. त्यानुसार, देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी दरमहा 3 लाख 40 हजार रुपये वेतन मिळणार आहे. याआधी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात 2 लाख 25 हजार रुपये वेतन मिळत होते. या वेतनात वाढ करण्यात आली असून, त्यात अन्य भत्ते आणि सुविधा समाविष्ट आहेत.

Ajit Pawar । अजित पवारांकडून ‘या’ नेत्याला बक्षीस मिळणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुख्यमंत्र्यांना पगाराशिवाय इतर सरकारी सोयी आणि सुविधांचा देखील लाभ मिळतो. यामध्ये सरकारी निवास, सरकारी वाहन, सुरक्षा यंत्रणा, तसेच इतर महत्त्वाच्या प्रशासनिक सुविधा समाविष्ट आहेत. मुख्यमंत्र्यांची जीवनशैली आणि प्रशासन चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या अन्य संसाधनांची देखील ही यादी आहे.

Cricketer Dies l ब्रेकिंग! क्रिकेट विश्वावर मोठी शोककळा, क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू

यंदाच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच राज्यातील प्रमुख नेते आणि मंत्री उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तथापि, एकनाथ शिंदे यांचे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.

Narendr Modi । ब्रेकिंग! पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांकडून तपास सुरु

Spread the love