‘देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे’, सत्यजीत तांबेंच वक्तव्य चर्चेत

'Devendra Fadnavis is like a big brother', Satyajit Tambe's statement in discussion

अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Independent candidate Shubhangi Patil) यांचा पराभव करत नाशिक पदवीधर मतदार संघातून सत्यजीत तांबे यांचा विजय झाला आहे. कॉंग्रेस कडून निलंबन झाल्यानंतर सत्यजित तांबेंचा झालेला हा विजय संपूर्ण राज्यभर चर्चेत राहिला आहे. निवडणूक जिंकताच सत्यजीत तांबे यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.

‘माझा भाऊ मुख्यमंत्री आहे’ म्हणत तरुणाने दारू पिऊन पोलीस स्टेशनमध्येच घातला राडा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तांबे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत, तसंच आपल्याला आणि आपल्या परिवाराला भाजपकडे ढकलण्याचे प्रयत्न केले अशी टीका देखील त्यांनी केली आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे आपल्याला मोठ्या भावासारखे आहेत असं वक्तव्य सत्यजित तांबे यांनी केले आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.

मोठी बातमी! अदानींची शेअर मार्केट मधून हाकलपट्टी; वाढते नुकसान पाहून NSE ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

दरम्यान, काँग्रेसने निलंबन केल्यानंतर सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांच्या विजयानंतर त्यांनी घडविलेल्या इतिहासची चर्चा जोरदार होऊ लागली आहे. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून विजय मिळवल्याने थोरात आणि तांबे यांच्या इतिहासाची चर्चा आता राज्याच्या राजकारणात होऊ लागली आहे.

अन् गौतमीच्या कार्यक्रमात महिलांनी हातात घेतली काठी, पुढे काय झाले हे वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *