Site icon e लोकहित | Marathi News

“देवेंद्र फडणवीस हे दहावं आश्चर्य महाराष्ट्रात बसलंय”, संजय राऊतांचा हल्लाबोल

"Devendra Fadnavis is sitting in Maharashtra's tenth wonder", Sanjay Raut's attack

नोव्हेंबर 2019 मधला ‘तो’ पहाटेचा शपथविधी! त्या शपथविधीने राजकीय वर्तुळात उडालेली खळबळ. त्यानंतर भाजपला बसलेला धक्का आणि महाराष्ट्रात स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार अवघा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. दरम्यान ‘तो’ पहाटेचा शपथविधी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

माझ्यासोबत दोनदा विश्वासघात झाला, फडणवीसांनी सांगितला ‘तो’ किस्सा

तो शपथविधी शरद पवारांसोबत चर्चा करूनच झाला होता, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखती दरम्यान केले आहे. 23 नोव्हेंबर 2019 च्या सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र हे सरकार अवघ्या 72 तासांत कोसळले. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कधीच स्पष्ट वक्तव्य केले नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यावर आता स्पष्ट बोलले आहेत. आता यावरून संजय राऊत यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.

लग्न कार्यात काम करायला गेल्या होत्या मात्र घरी परतल्याच नाहीत; वाटेतच काळाने घातला घाला

संजय राऊत म्हणाले, अलिकडे त्यांची वक्तव्य पाहतोय फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य आहे. जगात आधीची सात आश्चर्य असून दिल्लीत दोन आश्चर्य बसलेली आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे दहावं आश्चर्य महाराष्ट्रात बसलं आहे. अशा शब्दात राऊतांनी जोरदार टीका केली आहे.

दोन वेळचे जेवणही मिळत नव्हते, आज आहे कोट्यवधींचा मालक; वाचा एमसी स्टॅनच्या संघर्षमय जीवनाची कहाणी

Spread the love
Exit mobile version