अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या त्यांच्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. आतादेखील त्या अशाच एका वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. नवनवीन राणा यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक मोठं विधान केलं आहे. नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री आहेत आणि तेच महाराष्ट्राचा विकास करू शकतात. असं विधान त्यांनी केलं आहे.
ग्राहकांच्या खिशाला लागणार मोठी कात्री! सीएनजी दरात होणार वाढ?
त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारवर निशाणा साधलाय. तर भाजपनं (Bjp) नवनीत राणा यांना पक्षात येण्याची ऑफर देखील दिली आहे.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! बच्चू कडू यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवले
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचा विकास चांगल्या पद्धतीने करू शकतात. ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे पाऊल पडले तिथं विकासच होणार. आणि आमच्यासाठी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
कार्यकर्त्यांनी घातला तुफान राडा; स्वतः गौतमी पाटीलनेच थांबवला कार्यक्रम