Site icon e लोकहित | Marathi News

Fraud News । राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! देवेंद्र फडणवीसांचा पी. ए. असल्याचे सांगत केली १५ लाखांची फसवणूक

Fraud News

Fraud News । हल्ली फसवणुकीच्या घटनेत वाढ झाली आहे. फक्त सेलिब्रेटीच नाही तर सर्वसामान्य नागरिकांची देखील फसवणूक केली जात आहे. अशातच आता राजकीय वर्तुळात एक खळबळजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा पी. ए. असल्याचे सांगत तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. (Latest marathi news)

Sujay Vikhe Patil । सुजय विखेंबाबत ते वक्तव्य करणं मनसे पदाधिकाऱ्याला भोवलं; थेट पदावरून करण्यात आली हकालपट्टी

याबाबत अधिक माहिती अशी की, आपण देवेंद्र फडणवीस यांचा पी. ए आहे, असे सांगत दोन जणांनी सोसायटीचे काम करून देण्याच्या नावाखाली १५ लाखांची फसवणूक केली आहे. सुहास महाडिक आणि किरण पाटील अशी दोघांची नावे आहेत. महत्वाचे म्हणजे यातील एका जणावर या पूर्वी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

BJP Candidate List । ब्रेकिंग! भाजपनं जाहीर केली चौथी यादी, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळाली संधी

अशातच आता या दोघांवर मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात १७०, ४१९, ४२०,३४ भा द वी कलमातर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास मरीन ड्राइव्ह पोलिस करत आहेत. या संपूर्ण घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीही अनेक राजकीय नेत्यांच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.

Loksabha Elections 2024 । सातारच्या राजकारणात मोठी खळबळ! उदयनराजे भोसले नाराज, दिल्लीत ठोकला तळ

Spread the love
Exit mobile version