आधारकार्ड ( Aadhar Card) हे महत्त्वाचे कागदपत्र समजले जाते. शाळेतील प्रवेश घेण्यापासून ते बँकेचे व्यवहार पूर्ण करण्यापर्यंत सर्व कामांना आधार कार्ड लागते. आधारकार्ड वर आपले नाव, पत्ता, फोटो, जन्मतारीख व फोन नंबर अशी वैयक्तिक माहिती ( Personal Imformation) असते. मात्र, याच आधार कार्डवर फोटो दुसऱ्या कोणाचा आणि नाव तिसऱ्या कोणाचे असे अनेक प्रकार घडतात.
सध्या देखील असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एका सात वर्षाच्या मुलाच्या आधारकार्डवर चक्क राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) यांचा फोटो असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे सध्या या मुलाच्या आधारकार्डची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर आता हे आधार कार्ड देखील चांगलंच व्हायरल झालं आहे. सिंदेवाही तालुक्यात राहणाऱ्या जिगल जीवन सावसाकडे या मुलाच्या आधारकार्डवर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापून आला आहे. त्याच्या कुटुंबियांना ही माहिती समजताच त्यांनी फोटो बदलून घेण्यासाठी आधार कार्ड केंद्र गाठले. यावेळी प्रशासनाने आपली चूक दुरुस्त केली. सोबतच ही गंभीर चूक करणाऱ्या एजन्सी बाबत चौकशी करून कारवाई करणार असल्याचं देखील सांगितलं आहे.
आनंदाची बातमी! मुंबईसह राज्यातील ‘या’ भागात पडला मुसळधार पाऊस