
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण पक्षचिन्ह यावर आज महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार शिवसेना व धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाला आहे. यामुळे मागील 60 वर्षांपासून शिवसेना व ठाकरे हे नाते आता संपुष्टात आले आहे. दरम्यान आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक ट्विट केले आहे.
“…त्याचा काही परीणाम होत नसतो”, निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया
ट्विट करत फडणवीस यांनी लिहिले की, “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करीत हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणार्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल मी त्यांचे आणि राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो.”
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करीत हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणार्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल मी त्यांचे आणि राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो. @mieknathshinde
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 17, 2023
‘पैसा मिळेल पण नाव गेले..’ राज ठाकरे यांनी व्हिडिओ शेअर करत उद्धव ठाकरेंना डिवचल
दरम्यान, एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी काही महिन्यांपूर्वी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर ही लढाई सुरु होती. आता यावर निर्णय झाला असून इथून पुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे. उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला पक्ष आता शिंदेंच्या हातात गेला आहे.
निवडणूक आगोयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “चोर कधीही…”