मागील बऱ्याच दिवसांपासून पंकजा मुंडे ( Pankja Munde) यांना भाजपकडून सातत्याने डावलले जात आहे. यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा कायम होत असतात. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जेष्ठ कन्या पंकजा मुंडे भाजपामधील एक महत्त्वाच्या नेत्या आहेत. परंतु, त्या भाजपाला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती मागील काही दिवसांत समोर येत होती.
बिग ब्रेकिंग! कोल्हापूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग
मध्यंतरी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP) पक्षाकडून पंकजा मुंडे यांना ऑफर आली होती. दरम्यान आता ठाकरे गटाकडून देखील त्यांना ऑफर आली आहे. शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार सुनील शिंदे यांनी याबाबत वक्तव्य केले होते. “भाजपमध्ये पंकजा मुंडेंवर अन्याय होतोय. ही त्यांच्या पक्षांतर्गत बाब असून त्यावर आम्ही काही बोलणार नाही. मात्र, त्यांच्या कर्तृत्वाची आम्हाला नेहमीच कदर असेल. त्यामुळे त्यांना शिवसेनेत यायचे असेल तर त्यांचे आम्ही स्वागत करु.” असे सुनील शिंदे म्हणाले होते.
ठाकरे गटाकडून आलेल्या थेट आमंत्रणामुळे पंकजा मुंडे ठाकरे गटात जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पंकजा मुंडे भाजपामध्ये खुश असून कोणत्याही प्रकारे त्या पक्ष सोडणार नाहीत. अशी माहिती त्यांनी दिली आहे.
जेष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन! मोठा मतदारवर्ग आपल्या बाजूला करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मोठा प्लॅन