Devendra Fadnavis । फडणवीसांची शरद पवारांवर जहरी टीका, म्हणाले; “पवारांच्या आशीर्वादानेच मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष, आता….”

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis । नुकतीच एका मराठी टीव्ही चॅनेलने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जहरी टीका केली आहे. “पवारांच्या आशीर्वादाने मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष पाहावा लागला. असे संघर्ष आपण अनेक घराण्यात पाहिले असतील. पवारांनी अनेक संघर्षांना आशीर्वाद दिले असून हे कालचक्र आहे,” असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. (Latest marathi news)

Pakistan Lashkar Terrorist । मोठी बातमी! 26/11 च्या आणखी एका मास्टरमाइंडचा पाकिस्तानात खात्मा

“शरद पवार हे महाराष्ट्रातील मोठे नेते असून त्यांनी एक काळ गाजवला आहे. मी शरद पवारांचं पर्व वगैरे होतं असं काही मानत नाही. आजही ते संघर्ष करताना आपल्याला दिसत आहेत. पण आज लोकांना देशात एकच नेतृत्व मोठं आणि आश्वासक वाटतं ते म्हणजे मोदींचं. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) लोकांचा विश्वास आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

Maratha Reservation । सर्वात मोठी बातमी! मराठा समाजाने घेतलेले 10 महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने मंजूर

पुढे फडणवीसांना तुम्ही अजितदादांना (Ajit Pawar) सोबत घेऊन बदला घेतला आहे का? असा सवाल विचारताच त्यांनी, “मी स्वत:ला चाणक्य समजत नाही. शरद पवार चाणक्य असतील. समजा कोणी धोका दिला किंवा विश्वासघात केला तर त्याला उत्तर द्यावं, हे मी राजकारणातच शिकलो आहे. राजकारणात अपमान होत असतात. पण विश्वासघात सहन करायचा नसतो. म्हणून मी बदला घेतला असं म्हणणार नाही,” असेही फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

Supriya Sule । सुप्रिया सुळेंनी जाहीर केली बारामतीतून उमेदवारी? व्हॉटसअ‍ॅप स्टेटसवरून रंगलीय चर्चा

Spread the love