मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये सध्या शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवर सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या युतीमुळे कोणाला फायदा होणार याबाबतीत तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजपकडून या युतीबाबत जोरदार टीका केली जात आहे. भाजपचे अनेक नेते या युतीसंदर्भात प्रतिक्रिया देत आहेत. आता यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
Indapur: इंदापुरात बंदुकीच्या धाकावर चोरट्यांनी लुटले 3 कोटी 60 लाख, पोलिसांत फिर्याद दाखल
नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलत होते यावेळी ते म्हणाले, “मी यावर एवढंच म्हणेन की विनाशकाले विपरीत बुद्धी”, अशा सूचक शब्दांमध्ये फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर, यावेळी फडणवीसांनी शिवसेनेचा दसरा मेळावा आणि गुलाम नबी आझाद यांची काँग्रेसला सोडचिट्ठी या मुद्द्यांवरदेखील स्पष्ट भाष्य केलं.
दरम्यान, राज्यामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित झाली. शिवाजी पार्कवर हा मेळावा घेण्याची तयारी शिवसेनेकडून सुरू करण्यात आलीये. पण, पोलीस प्रशासन यासंदर्भात काय निर्णय घेईल याबाबत जोरदार चर्चा चालू आहे. “राज्य सरकार नियमाबाहेरचं काहीही करणार नाही”, अशी प्रतिक्रिया यावेळी फडणवीसांनी दिली आहे.
खोका, मोका आणि धोका! सामनातून शिवसेनेने गद्दार म्हणत केली जहरी टीका
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे ते काय निर्णय घेतील हे मला माहित नाही. ते मेळावा घेणार का नाही याची मला कल्पनाही नाही. गृहमंत्री म्हणून एवढंच सांगतो, जे जे नियमामध्ये बसेल ते सर्व आम्ही करू ”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.