
गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Elections) भाजपने या वेळी देखील बाजी मारलेली आहे. यामध्येच आता गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतची माहिती देखील समोर आली आहे. भाजपने (BJP) याबाबतची घोषणा देखील केली आहे. यावर आता भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात एकूण 182 कारखाने सुरू, गाळप हंगाम तेजीत; शेतकऱ्यांना होणार फायदा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपचं गुजरातचा विकास करू शकतो. मोदीजींच्या नेतृत्वातच भारत पुढं जावू शकतो हे गुजरातच्या जनतेने दाखवून दिले आहे”. त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, “आप दिल्लीपुरत मर्यादीत हे गुजरातने दाखवून दिले आहे. त्यामुळे मी गुजरातच्या जनतेचं अभिनंदन करतं”.
भाजपची मोठी घोषणा! ‘हे’ असणार गुजरातचे नवीन मुख्यमंत्री
आत्तापर्यंत समोर आलेल्या अपडेटनुसार, गुजरातमधील 182 जागांपैकी 157 जागांवर भाजप पुढे आहे. जवळपास 84 जागा भाजपने जिंकल्या आहेत. यामुळे भाजपला गुजरात निवडणुकीमध्ये विक्रमी विजय मिळाला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या विजयामुळे भाजपमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
धक्कादायक! वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार; वाचा सविस्तर
भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील (CR Patil) यांनी सांगितलं की, “गुजरातचे वर्तमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत”. १२ डिसेंबरला याबाबत शपथविधी होणार आहे. या शपथविधीसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) त्याचबरोबर अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. गांधीनगर (Gandhinagar) येथे विधानसभेच्या मागच्या मैदानात शपथविधी होणार आहे.