Devendra Fadanvis | रविवारी अचानकपणे अजित पवार (Ajit Pawar) यांनी ९ आमदारांसोबत बंड करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. तसेच त्यांनी आपल्याला पक्षाचा (NCP) पाठिंबा असून पक्ष आणि चिन्हावरही त्यांनी दावा केला आहे. वर्षभरापूर्वी विरोधी बाकावर असलेले अजित पवार हे आज सत्तेत सहभागी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. परंतु यावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना टीका सहन करावी लागत आहे. (Latest Marathi News)
‘या’ ठिकाणी पडणार आज मुसळधार पाऊस; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचे अपडेट
प्रसिद्ध वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘सध्याचे राजकारण असंवैधानिकदृष्ट्या सुरू आहे. घटनेच्या चौकटीत न बसणाऱ्या गोष्टी होत असतील जर चाणक्य नीति असेल तर ही चाणक्य नीति मतदारांच्या विरोधातील आहे. त्यांनी त्याला नकार दिला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सगळे राजकारण नासवलेलं असून ते अतिशय विद्रूप राजकीय चेहरा म्हणून पुढे आले आहेत,’ अशी बोचरी टीका सरोदे यांनी केली आहे.
Shah Rukh Khan। अपघातनंतर पहिल्यांदाच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला शाहरुख, पहा व्हिडिओ
‘शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांचा हा पक्षांतर्गत विषय आहे. न्यायालयाचा विलंब झाला त्यामुळे शिंदे- फडणवीस सरकार अस्तित्वात आहे. परंतु येत्या काही दिवसातच एकनाथ शिंदें (Eknath Shinde) सह त्यांचे मंत्री आणि त्यांचे आमदार अपात्र ठरविले जातील’, असा दावा सरोदे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कुणाचा? आमदारांची सत्वपरिक्षा, आजच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष
हे ही पहा