Devendra Fadnavis । लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha election) राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी जागावाटपावर अजूनही चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत आपल्याला आगामी निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना खूप मोठा धक्का दिला आहे. (Latest marathi news)
Mumbai News । धुलीवंदनाच्या दिवशी भयानक दुर्घटना! समुद्रात पाच विद्यार्थी बुडाले
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकर यांच्या या निर्णयामुळे शरद पवारांना खूप मोठा धक्का बसला आहे. कारण काही दिवसांपूर्वी महादेव जानकर यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली होती, त्यावेळी शरद पवारांनी त्यांना माढा लोकसभेची जागा दिली होती.
रासप आणि महाविकास आघाडी अशी युती होईल, असे वाटत असताना महादेव जानकर यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, माढा लोकसभा मतदार संघात महादेव जानकर यांना मोठा जनाधार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. साहजिकच याचा मतांवर परिणाम होईल.
Supriya Sule । सुप्रिया सुळे यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; म्हणाल्या, “भाजपने मला…”