Devendra Fadnavis । केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच राज्यात निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. नुकताच राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी आज परभणीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (Latest marathi news)
Eknath Shinde । निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ
महायुतीकडून या निमित्ताने परभणीत एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी महादेव जानकर यांचं कौतुक केले. “महादेव जानकरांना पाच वर्षात 1 रुपयांचा डाग देखील या कुणी लावू शकलं नसून हा मंत्री फाटकाच आला आणि मंत्रिमंडळ गेल्यानंतरही फाटकाच राहीला आहे. जन्मभरही हा फाटकाच राहणार आहे. जानकर यांची श्रीमंती ही इथे बसलेले लोकं आहेत.”
Satara Lok Sabha Election । साताऱ्याच्या राजकारणात मोठी खळबळ! उदयनराजेंचा पत्ता होणार कट?
“महाराष्ट्रातील दिन दलित, आदिवासी, गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्यांक यांच्या मनामध्ये जी जागा आहे, ती महादेव जानकरांची खरी श्रीमंती आहे. जानकर हे मूर्ती लहान पण कीर्ती महान आहेत. माझ्यासोबत त्यांनी पाच वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. कसलीही कूरकूर नाही. सातत्याने आपल्या खात्याचं काम अतिशय नेटाने करायचं, एवढंच त्यांचं ध्येय,” असेही फडणवीस म्हणाले.
Prakash Ambedkar । मोठी बातमी! प्रकाश आंबेडकर यांना सर्वात मोठा धक्का