राज्यात मोठ्या उत्साहात होळी आणि धुलिवंदन साजरे केले जात आहे. यामध्ये सामान्य लोकांपासून ते कलाकार आणि राजकीय नेते सर्वचजण धुलिवंदन साजरी करताना दिसत आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या, नेत्यांच्या घरी, धुलिवंदन साजरं केलं जात आहे. यामध्येच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील धूलिवंदन साजरं केलं.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे लवकरात लवकर पंचनामे करा; एकनाथ शिंदे यांचे निर्देश
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजप कार्यालयात धुलिवंदन साजरं केलं आहे. धूलिवंदन साजरं केल्यांनतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ विधानसभेत आम्ही सांगितलं होतं की खूप लोकांनी आम्हाला त्रास दिला आहे. त्या सर्वांचा बदला घेऊ. आता आमचा बदला हा आहे की आम्ही त्या सगळ्यांना माफ केलं. आमच्या मनात कोनाबद्दलच कोणतीही कटुता नसल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. त्याचबरोबर फडणवीस पुढे म्हणाले, “मला एक-दोन लोकांना सल्ला द्यायचा आहे की उत्तर भारतामध्ये होळीच्या दिवशी शिमगा करण्याची पद्धत आहे. काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात. मला त्यांना सांगायचंय की एखादा दिवस ठीक आहे. पण उरलेले ३६४ दिवस आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न करा” असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
सनी देओलने अहमदनगरमधील शेतकऱ्यासोबत मारल्या गप्पा; पाहा VIDEO