मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare) या मागील काही दिवसांपूर्वी वारकऱ्यांवरील चुकीच्या वक्तव्याने चर्चेत आल्या होत्या. इतकंच नाही तर यामुळे त्यांच्यावर टीका देखील झाली होती. यावरूनच त्यांनी शिंदे-फडणवीस ( Shinde -Fadanvis) सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच अगामी काळात एकनाथ शिंदेंचा भाजपकडून गेम होणार असल्याचा इशारा देखील अंधारे यांनी दिला आहे.
गौतमी पाटीलचे लोकांना भावनिक आवाहन; म्हणाली, “माझे कार्यक्रम बंद करू नका, माझी…”
” माझी व्हायरल झालेली क्लिप ही भाजपचे षडयंत्र असून 15 वर्षांनंतर ही क्लिप व्हायरल होत आहे. तसेच खरा वारकरी असा कोणताही वाद घालणार नाही. मला विरोध करणारे हे कीर्तनकार नाहीत तर पेड कीर्तनकार आहेत. ते प्रहसनकार आहेत. मोहन भागवत यांच्या संप्रदायाचे ते कीर्तनकार आहेत.” असे म्हणत सुषमा अंधारे यांनी क्लिप व्हायरल करणाऱ्या विरोधकांना धारेवर धरले.
“…तर संजय राऊत शरद पवारांच्या मांडीवर बसलेले असतील”; शिंदे गटातील आमदाराकडून गौप्यस्फोट
यासोबतच त्यांनी एकनाथ शिंदेंचा लवकरच भाजपकडून गेम होणार असल्याचा इशारा दिला आहे. भूखंड घोटाळ्यावरून एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असून देवेंद्र फडणवीस लवकरच शिंदे गटाचे 20 आमदार फोडून लवकरच मुख्यमंत्री बनतील. असे म्हणत सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदेंना इशारा दिला आहे. तसेच भविष्यात फडणवीस नरेंद्र मोदींना देखील धोका देतील. असा दावा त्यांनी केलाय.
मुख्यमंत्र्यांविरुद्ध अपशब्द वापरणे पडले महागात; ‘या’ नेत्यावर झाले इतके गुन्हे दाखल