देवेंद्र फडणवीसांनी घेतली सूत्रे हातात; कसबा चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी

Devendra Fadnavis took the reins; BJP's strong preparation for Kasba Chinchwad by-election

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रमुख पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. बरीच राजकीय उलथापालथ या दोन्ही मतदारसंघात पहायला मिळत आहे. कसब्याची पोटनिवडणुक बिनविरोध होणार अशी शक्यता वर्तवली जात असताना देखील भाजप व मविआकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्रिय नसल्याचे दिसून येत होते. ( Kasba Chinchwad Assembly Elections 2023)

“…अन् शेतकरी आजोबांनी इंग्रजी मधून बोलायला सुरुवात केली”, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी सगळी सूत्रे हातात घेत कसबा व चिंचवडचा गड राखण्यासाठी खास लोकांना जबाबदारी दिली आहे. भाजपच्या निवडणूक प्रभारीपदी मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय कसबा निवडणूक प्रमुखपदी माधुरी मिसाळ, सहप्रमुख पदी धीरज घाटे आणि चिंचवडच्या प्रमुखपदी शंकर जगताप यांना जबाबदारी दिली आहे.

शिवसेना आक्रमक! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विरोधात जेलभरो आंदोलन

मुरलीधर मोहोळ हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांच्या अत्यंत जवळचे व विश्वासू मानले जातात. यामुळे त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी मध्यंतरी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी ते चांगलेच चर्चेत आले होते.

“मी तुम्हाला करते मुजरा”, गौतमी पाटीलच नवीन गाणं रिलीज होताच नेटकऱ्यांनी घेतलं डोक्यावर!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *