Devendra Fadnavis । सत्ताधारी आणि विरोधक लोकसभेच्या (Loksabha election) प्रचारादरम्यान एकमेकांवर टीका करत आहेत. दरम्यान, खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकत्याच घेतलेल्या माढा मतदारसंघातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) जुना ऑडिओ ऐकवत महागाई, पेट्रोल आणि गॅस दरवाढीवर टीका केली. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेतला आहे. (Latest marathi news)
Viral News । धक्कादायक! भर मंडपात नवरदेवानं केलं असं काही कृत्य की..
“शरद पवार साहेबांचे व्हिडिओ आम्ही दाखवत गेलो तर त्यांनी किती कोलांट्या उड्या त्यांनी मारल्या आहेत हे तुमच्या लक्षात येईल. मोदी साहेबांनी सतत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं प्रेशर असताना ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्या त्या वेळी गॅसचे दर कमी केले. जरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसचे दर वाढले तरी ते स्टेबल ठेवण्याचं काम मोदींनी केलं आहे,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तरात म्हटलं आहे.
Ajit Pawar । “म्हणून मी भाजपसोबत गेलो”, अखेर अजित पवार यांनी केला मोठा खुलासा
फडणवीस यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. “खुर्चीच्या ऑफरवर आापले विचार सोडणारे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे आहेत, एकनाथ शिंदे नाहीत. एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत. एकनाथ शिंदे विचारांसाठी बाहेर पडले आहेत,” असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
Sangli News । सांगलीच्या राजकारणातून धक्कादायक बातमी! माजी आमदाराच्या गाडीवर दगडफेक