राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज 59 वा वाढदिवस आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त अनेक राजकीय नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी प्रत्यक्ष भेटून तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आता या वाढदिवसानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! कसबा, चिंचवड पोटनिवडणूक रद्द होऊ शकते; कायदेतज्ज्ञांनी केलं मोठं विधान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी त्यांच्या या भेटीचे फोटो आपापल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दिसत आहे की देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे.
धक्कदायक! बाप दररोज दारू प्यायचा म्हणून बापाला कंटाळून दोघा मुलांनी जन्मदात्या बापाचीच हत्या केली
एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत लिहिले की, “आज माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार निरंजन डावखरे हेदेखील उपस्थित होते”.
आज माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटून शुभेच्छा दिल्या.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 9, 2023
यावेळी आमदार निरंजन डावखरे हेदेखील उपस्थित होते.@Dev_Fadnavis pic.twitter.com/rml3UCArzH
कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आजपासून सुरवात; दिग्गज नेते राहणार उपस्थित