
Devendra Fadnavis । प्रत्येक बुथवर मतदान वाढले पाहिजे हा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मेळावे, बैठका खूप होतात मात्र मतदारांना कोणीच भाषण देत नाही. मात्र असं करायचं नाही. मोदीजींनी सांगितलं मला लोकसभा नाही तर मला बुथ जिंकायचं आहे. ही लढाई बुथची आहे. आज मी देखील स्वतः बुथची बैठक घेतली. असा मोठा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पश्चिम नागपूरच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला होता. यावेळी फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची संवाद साधला आणि मोठे वक्तव्य केले आहे.
Bjp । धक्कादायक बातमी! पुण्यामध्ये भाजपकडून आचारसंहितेचा भंग
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी बुथ लेवलवर चालणाऱ्या कामाचा आढावा घेत माहिती दिली. त्याचबरोबर जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील बुथवर काम करताना कशा पद्धतीने काम करायचं याची देखील माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
Nana Patole । नाना पटोलेंची नाराजी महाविकास आघाडीला भोवणार? म्हणाले; “आघाडीचा धर्म…”
त्याचबरोबर पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी दहा वर्ष पश्चिमचा आमदार राहिलो आहे. त्यामुळे या ठिकाणी माझं नातं खूप वेगळ आहे . मात्र पश्चिम नागपूरची जागा गमवावी लागली.. मला विश्वास आहे जर आपण सर्वांनी मनावर घेतले तर नितीन गडकरी यांना मोठी लीड मिळेल.. आणि येत्या विधानसभेत पश्चिम नागपूरात कमळ फुलून आमदार निवडून येईल.. यात मला काहीच शंका नाही असं फडणवीस म्हणाले आहेत.
Shrikant Shinde । अखेर संपला कल्याण लोकसभेचा सस्पेन्स, देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला ‘हा’ उमेदवार