
मुंबई : काल मुंबई हायकोर्टात दसरा मेळावा संदर्भात सुनावणी करून, शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला शिवतिर्थावर दसरा मेळावा घ्यायची परवानगी दिली. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल आहे. दरम्यान आता कोर्टाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोर्टाने जे काही सांगितलं आहे ते प्रशासन मान्य करेल, याच्यापेक्षा जास्त काही बोलण्याची आवश्यकता नाही. कोर्टामध्ये पोलिसांनी आणि महानगरपालिकेने त्यांची भूमिका मांडली होती, त्यावर कोर्टाने निर्णय दिला आहे. त्यामुळे कोर्टाने जो निर्णय घेतलाय तो पाळावा लागतो आणि आमच्याकडून तो पाळला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राला पुन्हा एकदा धक्का! वेदान्त-फॉक्सकॉन’नंतर आता ‘ही’ दिग्गज कंपनीनीही होणार स्थलांतरीत
दरम्यान उद्धव ठाकरेंनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “मेळाव्याला सर्वानी उत्साहाने या पण कोणत्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही याची काली घ्या. त्याचबरोबर पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, उत्साहात या…वाजत गाजत या…गुलाल उधळत या. पण शिस्तीनं या कुठेही आपल्या या तेजस्वी परंपरेला गालबोट लागेल असे काही कृत्य करू नका, असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्याने ‘अशी’ केली कमाल, पावने दोन एकरामध्ये मिळवले तब्बल 22 लाखाचे उत्पन्न