राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. मागच्या दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. त्यांनतर मुंबईतील मालवणीमध्ये (Malvani in Mumbai) देखील दोन गटात राडा झाला. या सर्व राड्यावरून खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी संताप व्यक्त करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली होती.
मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; तीन जण जागीच ठार
याबाबत माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, “ज्या पद्धतीने महाराष्ट्रात (Maharashtra) दंगल झालीय. या गोष्टी गंभीर आहेत. त्यामुळे झेपत नसेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, (The Home Minister should resign) अशी मागणीच सुप्रिया सुळेंनी केली आहे. आता यानंतर देवेंद्र फडणविस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत धमकी प्रकरणी अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अशा घटना…”
याबाबत बोलताना फडणविस म्हणाले, “मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांना याची अडचण झाली आहे. अनेक लोकांना मनाला असं वाटतं मी गृहमंत्री राहलो नाही पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची जाहीर सभा