Dhairyasheel Mohite Patil । 84 वर्षांचे असलेले शरद पवार अशा राजकीय खेळी खेळत आहेत की त्यांना संपवण्याचे स्वप्न पाहणारे त्यांचे राजकीय शत्रू थंडावले आहेत. महाराष्ट्रातील विरोधी महाविकास आघाडीच्या जागावाटपात शरद पवारांना सर्वात कमी जागा मिळाल्या असल्या तरी. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांच्या उमेदवारांचा स्ट्राईक रेट चांगला असण्याची शक्यता आहे. मागच्या काही दिवसापासून शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग वाढली आहे.
अनेक बड्या नेत्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. सध्या देखील सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळणार आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अकलूज या ठिकाणी मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर दाखल झाले होते. धैर्यशील मोहिते यांच्या पक्ष प्रवेश आणि स्नेहभोजनासाठी ते आले होते. या पक्षप्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.
Narendra Modi | गॅस सिलेंडरबाबत नरेंद्र मोदींनी केली सर्वात मोठी घोषणा!
शेवटी मोहिते पाटील शरद पवारांकडे परतले आहेत. शरद पवार यांनी गुरुवारी धैर्यशील मोहिते पाटील हे १४ एप्रिलला राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून १६ तारखेला उमेदवारी दाखल करणार असल्याची घोषणा केली. त्याच प्रमाणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रवेश केला आहे. आणि आता १६ तारखेला त्यांना उमेदवारी मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांना शरद पवारांनी दिला सर्वात मोठा धक्का!