Dhairyashil Mohite Patil । भाजपला सर्वात मोठा धक्का! धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला राजीनामा

Dhairyashil Mohite Patil

Dhairyashil Mohite Patil । ऐन निवडणूक (Loksabha election 2024) काळात राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात राजकीय खलबत पाहायला मिळत आहे. ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच आता पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Maharastra Politics । पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप, भाजपला मोठं खिंडार; बडा नेता करणार शरद पवार गटात प्रवेश

भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राजीनामा दिल्यानंतर आता ते लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या काही दिवसांपासून मोहिते पाटील नाराज असल्याच्या चर्चा होत्या आणि त्यांनी अखेर राजीनामा दिला आहे.

Madha Loksabha । शरद पवारांचा मोठा गेम, धैर्यशील मोहित पाटील करणार शरद पवार गटात प्रवेश

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक होते मात्र उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले होते. आता राजीनामा दिल्या नंतर ते शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची देखील शक्यता आहे.

Reliance Electric Car । मुकेश अंबानी करणार बडा धमाका, इलेक्ट्रिक कार बाजारात रिलायन्सची एंट्री

Spread the love