Dhangar Reservation | राज्य सरकारने (State Govt) धनगर समाजाच्या मागणीवर मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत धनगर आणि धनगड हे एकच असल्याचा जीआर (गाझेट नोटिफिकेशन) लवकरच जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जीआरचा मसुदा तयार करण्यासाठी दोन वरिष्ठ सनदी अधिकारी आणि धनगर समाजाच्या पाच प्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात येईल.
Pune Police । पुणे पोलीस दलात धक्कादायक घटना!
धनगर समाजाने अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याची मागणी केली होती आणि यासाठी त्यांनी पंढरपूरमध्ये आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत, धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि उपोषण मागे घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाने दिले आहे.
Uddhav Thackeray । निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का!
मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, धनगर समाजाचा अनुसूचित जमातींच्या प्रवर्गात समावेश करण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून सकारात्मक पावले उचलली जातील. या निर्णयामुळे अन्य कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. जीआरचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया पुढील चार दिवसांत पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर राज्याचे महाधिवक्त्यांचे मत घेतले जाईल. सरकारच्या या निर्णयामुळे धनगर समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचा मार्ग सुकर होईल अशी अपेक्षा आहे.