Dhangar Reservation । धक्कादायक! मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणासाठी तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या

Dhangar Reservation

Dhangar Reservation । सध्या राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आत्महत्याचे सत्र आता धनगर आरक्षणापर्यंत पोहोचले आहे. सध्या सांगलीच्या (Sangli) जत तालुक्यातल्या कोणीकुर येथील आबाचीवाडी या ठिकाणच्या एका तरुणाने धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar । अजित पवारांचं मराठा आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य; म्हणाले, “मागण्या टाळतोय…”

या तरुणाने शेतातल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत तरुणाने एक चिठ्ठी लिहीत आत्महत्या केली आहे. त्याचबरोबर गावातील ग्रामस्थांकडून देखील धनगर आरक्षणासाठी सदर तरुणांकडून आत्महत्या करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. सध्या या घटनेची नोंद पोलिस ठाण्यामध्ये झाली असून याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

Bjp । भाजपला सर्वात मोठा धक्का; बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगलीच्या आरेवाडी या ठिकाणी धनगर आरक्षणासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांचा दसरा मेळावा पार पडत आहे. तर दुसरीकडे या तरुणाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता धनगर आरक्षणासाठी देखील आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Maratha Reservation । ‘माझं बलिदान वाया जाऊ देऊ नका’ म्हणत मराठा आरक्षणासाठी विष पिऊन तरुणाने केली आत्महत्या

Spread the love