Dhangar Reservation । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी हायकोर्टातून फेटाळण्यात आली आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याबद्दलची मागणी धनगर समाजाकडून केली जात होती. याबद्दल आज हायकोर्टाने निकाल दिला असून ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे धनगर समाजासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
धनगर समाजाला एसटी कॅटेगिरी मधून आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजाच्या वतीने यशवंत सेनेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली असून या सुनावणी वेळी उच्च न्यायालयाकडून धनगर आरक्षणासंबंधीची याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे धनगर बांधवांना हा मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
यासंबंधी रस्त्यावरील लढाई सोबतच 2017 पासून यासंबंधीचा न्यायालयीन लढा देखील सुरू होता. मात्र आज याबाबत सुनावणी पार पडली असून न्यायालयाने निकाल देत आरक्षणाची मागणी फेटाळून लावली आहे.
Chhagan Bhujbal । मनोज जरांगेंबाबत छगन भुजबळ यांचे सर्वात मोठे वक्तव्य!