Ravindra Dhangekar । पुणे : पुण्यातून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ‘रवींद्र धंगेकर फक्त 8 वी पास’, अशा आशयाचा फोटो भाजपकडून (BJP) सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. याला आता रवींद्र धंगेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Latest marathi news)
Nilesh Lanke । “वेळ आली की मी सर्व सांगणार…”, निलेश लंके यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
“तुम्ही आता कर्मवीर भाऊराव पाटील, वसंतदादा पाटलांचं शिक्षण काढणार का? जनतेची नाळ आणि जनतेचा विकास यातच माझी पीएचडी झाली असून जनतेला काय हवं ते मला समजत. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. कर्मवीर भाऊराव पाटलांचं शिक्षणही आठवी होतं. वसंतदादा पाटील वैद्यकीय शिक्षण पहिल्यांदा महाराष्ट्रात आणलं. ते चौथी पास होते,” असे धंगेकर म्हणाले आहेत. (Muralidhar Mohol vs Ravindra Dhangekar)
Politics News । कोल्हापूरमध्ये मोठी खळबळ! सोशल मीडियावर शाहू छत्रपतींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट
“अनेक नेत्यांचे पीएचडीचे सर्टीफिकेट होतेत पण दडपले गेले. मी कोणाचं नाव घेत नाही. जे लोक माझ्यावर टीका करतात त्यांनी काय काय केलं हे सांगा. शिकलेले कितीतरी लोकं घरात बसली असून प्रतिस्पर्धी दिवसभर कुठे बसलेले असतात ते देखील त्यांनी सांगावं. जे माझे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांचे वेळापत्रक पहा,” असं थेट आव्हानच धंगेकरांनी दिले आहे.