Site icon e लोकहित | Marathi News

Dhanjay Munde : बिग ब्रेकिंग! बोगस खतं विक्री करणाऱ्या कंपनीचा परवाना रद्द; धंनजय मुंडे यांनी दिली माहिती

Dhanjay Munde : Big Breaking! Cancellation of license of bogus fertilizer selling company; Information given by Dhannajay Munde

Dhanjay Munde : बोगस खते आणि बि-बियाणांमुळे बळीराजाचे मोठे नुकसान होऊन दुबार पेरणी करावी लागते, त्यामुळे खर्च देखील जास्त होतो आणि बळीराजाला याचा मोठा फटका देखील बसतो. मागच्या काही दिवसापूर्वी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बोगस खते आणि बियाणांच्या कंपन्यांवर नवीन कायदा आणणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता कृषिमंत्री धनंजय मुंडे ऍक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी एका कंपनीचा परवाना रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.

आत्ताच्या घडीची मोठी बातमी! राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येणार? बड्या नेत्याच्या विधानामुळे चर्चांना उधाण

बोगस खतांच्या संदर्भामध्ये धुळे जिल्ह्यातील ग्रीनफिल्ड ऍग्रीकेम इंडस्ट्रीज या कंपनीवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. त्यांनी ही माहिती ट्विट करत दिली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी बोगस बि-बियाणांसाठी एक नंबर दिला आहे. ज्यावर आपण कृषी विभागाकडे तक्रार दाखल करू शकतो. (Agriculture News)

Sambhaji Bhide on Mahatma Gandhi। संभाजी भिडेंना महात्मा गांधींविरोधातील ‘ते’ वक्तव्य भोवलं! दाखल झाला गुन्हा

काय म्हंटल आहे धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये? (Dhanjay Munde Tweet)

बोगस खतांच्या संदर्भात धुळे जिल्ह्यातून तक्रारी आल्या नंतर कृषी विभागाने तात्काळ दखल घेत कारवाई करत, ग्रीनफिल्ड ऍग्रीकेम इंडस्ट्रीज या कंपनीचा खत विक्री परवाना निलंबित केला आहे.

बोगस खते-बियाणे यांची विक्री कृषी विभाग खपवून घेणार नाही. या कारवाईत सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन, बोगस खत-बी-बियाणे यांच्याबद्दल तक्रारी असतील तर शेतकरी बांधवांनी 9822446655 या नंबरवर whatsapp करावे ही विनंती. असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

Viral Video । मुंबईकरांचे हाल संपता संपेना! कंबरेएवढे पाणी आणि वाहतूक कोंडी, पहा व्हायरल व्हिडिओ

Spread the love
Exit mobile version