दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता म्हणून धनुष (Dhanush) ओळखला जातो. धनुष सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आज धनुषचा वाढदिवस आहे त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. धनुष करोडो लोकांच्या मनावर राज्य करत आहे. त्याचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. ‘वाय थिस कोलावरी डी’ या पहिल्या गाण्याने धनुषला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. चाहत्यांना नेहमीच त्याच्याबद्दल नवनवीन माहिती जाणून घेण्याची इच्छा असते. चला तर मग जाणून घेऊया धनुष बद्दल काही खास गोष्टी.
“आधीचे फडणवीस आणि आताचे फडणवीस यात खूप फरक दिसतोय”; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
कोणताही अभिनेता किंवा अभिनेत्री असो चाहत्यांना नेहमीच त्यांच्याद्दल काही खास गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असते. आपण आज धनुष बद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. धनुषने त्याच्या अभिनयाच्या जोरावर दाक्षिणात्य चित्रपटांसह बॉलिवूडमध्ये देखील स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली. धनुषकडे आज भरपूर प्रसिद्धी आणि पैसा देखील आहे. मात्र धनुष महिन्याला किती पैसे कमावतो याबद्दल तुम्हाला माहिती आहे आहे?
जिओचे हे ‘स्वस्त आणि मस्त’ रिचार्ज प्लॅन तुम्हाला माहीतच असायला हवेत; वाचा सविस्तर
धनुषच्या संपत्तीबद्दल पहिले तर त्याचा चेन्नईमध्ये २०-२५ कोटी रुपयांचा खूप आलिशान बंगला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, धनुष वर्षाला १५ कोटी रुपये कमावतो तर महिन्याला १ कोटी रुपये.
“आधीचे फडणवीस आणि आताचे फडणवीस यात खूप फरक दिसतोय”; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
धनुषने अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत काम केले आहे. त्याने केलेले चित्रपट देखील प्रेक्षकांच्या पसंतीत उतरतात. एका चित्रपटासाठी धनुष तब्बल ७-८ कोटी रुपये मानधन घेतो. त्याचबरोबर त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. त्याच्याकडे 45 लाखांची Jaguar XEकार आहे.
भाजपने पोलिसांच्या मदतीने निवडणुकीत पैसे वाटले; ठाकरे गटाचा गंभीर आरोप