
धर्मवीर आनंद दिघे ( Dharmveer Aanand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ हा चित्रपट दमदार मराठी चित्रपटांपैकी एक आहे. बॉक्स ऑफिसवर दमदार कमाईकरून व विविध पुरस्कार मिळवून या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले. या चित्रपटामध्ये आनंद दिघे यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक ( Prasad Oak) याने साकारली होती. मागील वर्षी १३ मे २०२२ ला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता प्रसाद ओकने एक खास पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने ‘धर्मवीर’ च्या पुढच्या भागाबाबत देखील सांगितले आहे.
अमोल कोल्हे यांच्यासोबत घडला धक्कादायक प्रकार; चक्क पोलिसांनीच…
या पोस्ट मध्ये प्रसाद ओकने लिहिले आहे की, ‘धर्मवीर’ या माझ्या आयुष्यातल्या एका अनोख्या वळणाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या भूमिकेनी व या चित्रपटाने मला जे काही दिले ते शब्दांपलीकडचे आहे. यासाठी प्रविण तरडे, मंगेश देसाई, मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील, सचिन नारकर, भट्टे काका, सचिन जोशी, मा. खा. श्रीकांत जी शिंदे आणि मा. मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब आणि धर्मवीर च्या संपूर्ण टीम चे अत्यंत मनःपूर्वक आभार आणि रसिक प्रेक्षकांचे सुध्दा आभार.
ICSE Result 2023 | ब्रेकिंग! दहावी, बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार, ‘या’ ठिकाणी पाहा निकाल
यापुढे चाहत्यांना अगदी सरप्राईज देत प्रसाद ओक लिहितो की, धर्मवीर च्या भाग २ ला सुद्धा आपले आशीर्वाद आणि प्रेम भरभरून मिळेल अशी मी आशा करतो…!!! “दिघे साहेब”… असेच कायम पाठीशी रहा” या पोस्टमुळे धर्मवीर चित्रपटाचा पुढचा भाग कधी येणार ? याबाबत प्रेक्षक प्रचंड उत्सुक झालेले आहेत. अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत चित्रपटाबद्दल प्रश्न विचारले आहेत.
Maharashtra Politics | पहाटेचा शपथविधी हा भाजपचा गनिमी कावा होता; भाजपच्या बड्या नेत्याने केला दावा