यंदाच्या वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्शवभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने श्रीगोंदा (Shrigonda) तहसील कार्यलयासमोर धरने आंदोलन केले.
ब्रेकिंग! विक्रम गोखलेंच्या मृत्यूची बातमी खोटी; पत्नीने दिली खरी माहिती
यामध्ये, अतिवृष्टी मुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार रूपये नुकसान भरपाई, गायरान जमीनी वरील निवासी व वसाहती साठी केलेले अतिक्रमण काढण्याचा निर्णय रद्द करणे, वीजबील माफी, रस्त्यांची झालेली दुरावस्था, विद्यार्थ्यांना फी माफी सारख्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे श्रीगोंदा तहसील कार्यलयासमोर धरने आंदोलन करत शासनाचा निषेध करण्यात आला.
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासन देखील शांत
यावेळी श्री. राहुल दादा जगताप, श्री. घनश्यामआन्ना शेलार, श्री. बाबासाहेब भोस, श्री. बाळासाहेब नाहटा, श्री. हरिदास आबा शिर्के, श्री. संजय आंनदकर सर, श्री. भाऊसाहेब खेतमाळीस, श्री. राजाभाऊ लोखंडे, तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते
पशुसेवा कृतज्ञता पुरस्कार सोहळा संपन्न; औरंगाबाद सिटी कॅनन क्लब चे उद्घाटन