Site icon e लोकहित | Marathi News

हिरेही झाले स्वस्त पण सोने चांदी महागले! यंदाचा अर्थसंकल्प वाचा एका क्लिकवर

Diamonds became cheap but gold and silver became expensive! Read this year's budget in one click

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर (Budget 2023) केला आहे. यामध्ये त्यांनी विविध महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या असून नवीन कर संरचना देखील जाहीर केली आहे. तसेच यंदाच्या संकल्पात सात उद्दिष्टांना महत्त्व देण्यात आले आहे. ज्यांना सप्तर्षी असे संबोधले जात आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील शैलेश लोढा कलाकाराचे पैसे अडकले! निर्मात्यांनी फिरवली पाठ

अर्थसंकल्पात भर देण्यात आलेली 7 उद्दिष्टे

1) पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक
2) विकासपट सर्वसमावेशक करणे
3) खऱ्या अर्थाने क्षमतांचा वापर करणे
4) हरितविकास ( Green Development)
5) युवकांचे सामर्थ्य
6) आर्थिक क्षेत्र उंचावणे
7) सर्व व्यक्तींना लाभ देणे

गायीच्या दुधात पुन्हा एकदा दरवाढ; पाहा काय आहेत नवीन दर

या गोष्टींच्या किमती होणार कमी जास्त

या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी कोणत्या गोष्टी महागणार व कोणत्या गोष्टी स्वस्त होणार याची देखील माहिती दिली आहे. यामध्ये मोबाईल फोन, हिऱ्यांचे दागिने, टीव्ही पॅनल, इलेक्ट्रॉनिक वाहने, सायकल या वस्तू स्वस्त होणार आहेत. तर सिगारेट, इमिटेशन ज्वेलरी, सोने, चांदी, प्लॅटिनम, इंपोर्टेड इलेक्ट्रिक वाहन या गोष्टी या वर्षात महागणार आहेत.

हा तर नवीनच नखरा! उर्फीने पायात नाही तर हातात घातली जीन्स; पाहा VIDEO

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा

1) अगामी काळात कृषी क्षेत्रासाठी डिजीटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर अॅग्रीकल्चर अॅक्सिलरेटर फंड उभारण्यात येणार आहे. यामुळे शेती स्टार्टअपना प्रोत्साहन मिळणार आहे.
2) भरड धान्याचे उत्पादन, त्याची विक्री आणि संशोधन यासाठी सरकार पुढाकार घेणार.
3) देशात नवीन 157 नर्सिंग कॉलेज स्थापन होणार.
4) लहान व किशोरवयीन मुलांसाठी नॅशनल डिजिटल लायब्ररी स्थापन होणार.
5) जेष्ठ नागरिकांना बचत योजनेवर सुविधा मिळणार
6) पंतप्रधान आवास योजनेचा निधी 66 टक्क्यांनी वाढला.
7) पायाभूत सुविधांसाठी निधीमध्ये 33 टक्क्यांनी वाढ
8) देशात 50 नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहेत.

‘या’ अख्ख्या शाळेत फक्त एक शिक्षक आणि एक विद्यार्थी, तरीही रोज भरते शाळा

Spread the love
Exit mobile version