महाराष्ट्रात गौतमी पाटीलला (Gautam Patil) ओळखत नाही, असं कोणी शोधूनही सापडणार नाही. मागील काही दिवसांपासून गौतमी पाटील लावणी कलाकार म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. दरम्यान गौतमीच्या लावणीच्या कार्यक्रमांमुळे इतर कलाकारांच्या सुपार्या बंद पडू लागले आहेत. असा आरोप तिच्यावर केला जात आहे.
“नोकरीच काहीतरी जुगाड करुन द्या, नाही तर मी पळून जाईल”, तरूणीचं उपमुख्यमंत्र्यांना पत्र
नांद्रे गावी येथिल ऊरुसनिमित्त गौतमी पाटीलचा सांस्कृतिक नृत्यसंगीताचा कार्यक्रम पार पडत आहे. गौतमीचे लावणीचे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात होत आहेत. मागच्या काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव सातत्याने चर्चेत आहे. गौतमी पाटीलच्या लावण्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावले आहे.
महावितरण अधिकाऱ्याशी फाडफाड इंग्रजीमध्ये बोलणाऱ्या शेतकऱ्याला मिळाला मीटर!
दरम्यान, गौतमीच्या लावणी कार्यक्रमांमुळे तमाशा किंवा लावणी सादर करणार्या कलाकारांच्या सुपार्या कमी झाल्याचे बोलले जात आहे. पण यावर बोलताना असं काही होत नाही, असे स्पष्ट कलाकारांनी सांगितले आहे. पण गौतमी ज्या वेशभूषेत लावणी सादर करते. त्यामुळे या संस्कृतीक परंपरेत चुकीच्यां प्रथा पडत आहेत. असे म्हणत नाराजी व्यक्त केली जात आहे.
मोठी बातमी! आमदार शहाजीबापूंच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा भीषण अपघात; १ जागीच ठार
दरम्यान, महाराष्ट्रात गौतमीचे लाखो चाहते आहेत. तर काही लोक गौतमीने नृत्यादरम्यान केलेल्या अश्लील हातवारे यावरून तिच्यावर टिका करत आहेत. अगामी ‘घुंगरू’ चित्रपटातून ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याचे बोलले जात आहे.
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी थेट देशाचे गृहमंत्री अमित शाह उतरणार मैदानात!