Site icon e लोकहित | Marathi News

गुलाबराव पाटील गुवाहाटीला शेण खायला गेले होते का? शेतकरी नेता आक्रमक

Did Gulabrao Patil go to Guwahati to eat dung? Aggressive farmer leader

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar, leader of Swabhimani Farmers Association) यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. मात्र अटकेंनंतर लगेचच न्यायालयानं रविकांत तुपकर यांना जामीन मंजूर केला असून त्यांची सुटका झाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांची देखील अकोला न्यायालयातून (Akola Court) सुटका झाली आहे.

देवंद्र फडणवीस यांनी ट्वीट केला गिरीश बापट यांचा भावनिक व्हिडीओ; पाहा VIDEO

दरम्यान, बाहेर येताच रविकांत तुपकर यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) गुवाहाटीला (Guwahati) शेण खायला गेले होते का? असा सवाल रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे.

“अजित पवार यांना 440 व्होल्टचा असा करंटच लागला पाहिजे, की….”, चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य चर्चेत

त्याचबरोबर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. रविकांत तुपकर म्हणाले, “एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली आहे. उठसूठ कोणालाही फोन करत असतात. मुख्यमंत्र्यांचा सरपंच झाला आहे” अशी जहरी टीका यावेळी तुपकर यांनी केली आहे.

शिंदे व ठाकरे गटाची धडधड वाढली! थोड्याच वेळात सत्तासंघर्षावर निकाल

Spread the love
Exit mobile version